मालवण : कुंभारमाठ येथे प्रधानमंत्री जनमन (PM JANMAN) योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांची अप्पर आयुक्त (विकास), कोकण विभाग माननीय डॉ. माणिक दिवे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या घरकुलांच्या बांधकामाची प्रगती तसेच लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या इतर आवश्यक मूलभूत सुविधांची सविस्तर माहिती घेतली. घरकुलांचे बांधकाम निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
प्रधानमंत्री जनमन योजनेच्या माध्यमातून कातकरी आदिवासी व वंचित घटकांतील पात्र कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार होत असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत असल्याचे यावेळी डॉ. दिवे यांनी नमूद केले. कुंभारमाठ येथे सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी संबंधित यंत्रणेला शुभेच्छा दिल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण, उपसभापती श्री. श्याम झाड, कुंभारमाठच्या सरपंच सौ. पुनम वाटेगावकर, उपसरपंच श्री. जीवन भोगावकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. राहुल परब, माजी गटविकास अधिकारी श्री. शाम चव्हाण, विद्यमान गटविकास अधिकारी श्री. सावंत, विस्तार अधिकारी श्री. परब, श्री. बांगर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रमोद निकम आदि. उपस्थित होते

कुंभारमाठ येथे प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांची अप्पर आयुक्त (विकास), कोकण विभाग यांच्याकडून पाहणी
1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106

Subscribe










