आ.दीपक केसरकर यांची स्पष्टोक्ती
मुंबई प्रतिनिधी:एकीकडे मुख्यमंत्री कोण यावरून तर्क वितर्क लागत आहेत.तर महायुतीचा शपथ विधी कधी होणार? महायुतीमध्ये नाराजी,अंतर्गत धुसफूस आहे का? अशा कितीतरी शंकाकुशंका प्रत्येक माणसाच्या मनात डोकावत आहेत.यातच आज मंत्री दीपक केसरकर यांनी या सर्व घडामोडींवर भाष्य केलं आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिलकूल नाराज नाहीत. असंही ते यावेळी म्हणाले.
नेमके काय म्हणाले मंत्री दीपक केसरकर?
यावेळी बोलताना दिपक केसरकर म्हणाले की, महायुतीचा ५ तारखेला शपथविधी होणार आहे. पण अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. म्हणून मी ही पत्रकार परिषद घेत आहेत. एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. प्रकिया लेट होत आहे त्यात त्यांची काही भुमिका आहे. भाजपची निवड प्रकिया कधी व्हावी हा भाजपचा विषय आहे. आज कोणतीही बैठक नव्हती. तरी आज बैठक रद्द वैगरे ह्या बातम्या येत आहेत, असं ते म्हणाले.दिपक केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिलकूल नाराज नाहीत. शुभ अशुभ दिवस आपण भारतात मानतो. यावर बोलणं चांगलं नाही.
मैदानाची पाहणी करायला एकच पक्ष जातो
ते पुढे म्हणाले , शपथविधीच्या सोहळ्यासाठी जागेची पाहणी करायला फक्त भाजप नेते गेले होते. यावरून चर्चा होत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाला जागा ठरवण्यासाठी सांगितले नसल्याचे बोलले जात आहे. यावर दिपक केसरकरांनी स्पष्टोक्ती दिली आहे.ते म्हणाले की, मी फडणवीसांना मेसेज केला. की महायुतीची सत्ता येत आहे. पण मैदानाची पाहणी करायला एकच पक्ष जातात. त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातो. आम्हाला ही कळवलं असतं तर आम्ही ही आलो असतो. पण जनतेने गैरसमज करु नये. आम्ही सगळ्यांसोबत एकत्र काम केलं आहे. एकनाथ शिंदेचा मान महाराष्ट्रात मान राखला जाईल. आम्ही १००% एकत्र आहोत. भाजपचे अध्यक्ष एकटे पाहणी करायला गेले. एकनाथ शिंदे आले नाहीत. तर यातून उगाच गैरसमज निर्माण होत आहेत, असं दिपक केसरकर यांनी सांगितलं.