मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस येथे स्थानिक गुन्हा अन्वेष्णचची कारवाई
कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस येथे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या शाखेने ही कारवाई केली असून यामध्ये ७ लाखांची टोयोटा ग्लांझा कार व १ लाख ४८ हजार किमतीची गोवा बनावटीची दारू असा एकूण ८ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवार दिनांक २ मे २०२६ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमर रमेश गायकवाड (वय ३०, रा. दिवे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) आणि आनंद बाबुराव कोकरे (वय ३०, रा. देलवडी, तालुका दौंड, जिल्हा ठाणे) हे आपल्या ताब्यातील टोयोटा ग्लांझा कारमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करत होते. स्थानिक गुन्हा अन्वेष्णच्या पथकाला याबाबतची टीप मिळाल्यानंतर त्यांनी शनिवारी २६ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ओरोस ब्रीज येथे सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. यामध्ये ७ लाखांची टोयोटा ग्लांझा कार व १ लाख ४८ हजारांच्या दारूसह एकूण ८ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा.श्री.मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा.कु.नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, सुधीर सावंत, सुरज पाटील, श्रे.पोलीस उपनिरीक्षक नाईक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सुरेश राठोड, पोलीस हवालदार/विल्सन डिसोजा, एडवर्ड बुथेलो, यांनी केलेली असून सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Subscribe










