नारूर येथे श्री देवी महालक्ष्मीचा ‘शिखर कलशारोहण’ सोहळा

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

योगिता कानडे / नारूर : श्री देवी महालक्ष्मी देवस्थान नारूर येथे रविवार, दि. ०३ मे २०२६ रोजी ‘शिखर कलशारोहण २०२६’ हा भव्य सोहळा अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न होणार आहे. या मंगलमय प्रसंगी दिवसभर विविध धार्मिक विधी, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

दिवसभराचे धार्मिक कार्यक्रम

कलशारोहण सोहळ्यानिमित्त सकाळी ६.३० वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात होईल. यामध्ये प्रामुख्याने खालील विधींचा समावेश आहे:

सकाळी ६.३० वा.: देवतांना प्रार्थना करून ‘नवचंडी अनुष्ठान’.

सकाळी ८.०० वा.: उपदैवत महापूजा.

दुपारी ९.०० वा.: श्रीदेवी महालक्ष्मी सालंकृत महापूजा, ओटी भरणे व नवस फेडणे.

दुपारी १०.०० वा.: सत्यअंबा पूजा व कुंकू मार्जन सेवा. (यजमान: गजानन प्रभाकर तेली कुटुंबीय, उसगांव गोवा).

दुपारी १२.३० वा.: बलिदान पूर्णाहुती, नैवेद्य आणि महाआरती.

दुपारी १.३० वाजल्यापासून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचे यजमानपद गजानन प्रभाकर तेली (गोवा) भूषविणार आहेत.

सायंकाळच्या सत्रात ३ ते ७ या वेळेत स्थानिक भजने होतील आणि त्यानंतर ७.०० वाजता महाआरती संपन्न होईल.

रात्रीचे आकर्षण: पालखी आणि नाटक


रात्री ९.०० वाजता देवीचा दिमाखदार पालखी सोहळा निघणार आहे. सोहळ्याची सांगता

रात्री १०.०० वाजता ‘वालावलकर दशावतार नाट्य मंडळ’ यांच्या विशेष नाटकाने होईल.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री देवी महालक्ष्मी देवस्थान कमिटी, चार बारा गावकर मंडळी आणि बहुमानकरी नारूर ग्रामस्थ मंडळ परिश्रम घेत आहेत. समस्त भाविकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन दर्शनासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!