नदी किनाऱ्यावरील अनधिकृत वाळूचे रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त
कुडाळ : तालुक्यातील कर्ली नदीकाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर आज मा. जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांचे निर्देशानुसार व उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे यांचे मार्गदर्शनाखाली तहसील कुडाळच्या पथकाने मोठी कारवाई केली. आज दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी उशिरा तहसीलदार सचिन पाटील, निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, मंडळ अधिकारी रविकांत तारी, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती मयेकर, नेरकर, सागरे, इंदप, कनवडे, पोलिस पाटील यांच्या पथकाने कर्ली नदी किनाऱ्यावरील अनधिकृत वाळूचे रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केले. सध्या कर्ली नदीमधील वाळू गटांचे लिलाव प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने, वाळू उपशाला बंदी असूनही कर्ली नदीमध्ये बोटींद्वारे वाळू काढली जात होती. याच अवैध वाळू वाहतुकीसाठी रॅम्प मालकांनी नदीकिनारी विविध ठिकाणी अनधिकृत रॅम्प तयार केले होते.