कणकवली तालुका पत्रकार संघाचा 2 मे रोजी पुरस्कार वितरण सोहळा

पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार विजेत्यांचा होणार स‌न्मान

कणकवली : कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे पत्रकारांसह विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या व्यक्तिमत्त्वांचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार2 मे 2026 रोजी स्वामी विवेकानंद सभागृह प्रहार भवन येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तर सभापती हर्षदा वाळके , नगराध्यक्ष संदेश पारकर , पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर , जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संजय माळवदे, ज्येष्ठ पत्रकार कै. शशी तायशेट्ये उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार चंद्रशेखर देसाई (दै. तरुण भारत ), कै. अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार संतोष पाटणकर (दै. लोकमत – खारेपाटन) तर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार प्रथमेश जाधव, यशस्वी उद्योजक पुरस्कारासाठी शिरवल गावचे सुपूत्र , यशस्वी उद्योजक संदीप चौकेकर ( अध्यक्ष- प्राणजीवन संयोग संस्था ) , सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी उत्तम पुजारे ,वृत्तपत्र कर्मचारी सन्मान पुरस्कारासाठी भास्कर रासम ( दै. सकाळ ) यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच वृत्तपत्र विक्रेते मालोजी कोकरे ( कणकवली ) , अरविंद मुद्राळे ( तळेरे ) , बाळा फोंडके ( फोंडाघाट ) यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच खारेपाटण येथील कै. सौ. विना राजेंद्र ब्रह्मदंडे यांच्या मरणोत्तर अवयव दानाने जवळपास सहा अवयव उपयोगात येऊन दुसऱ्यांना नवीन आयुष्य देण्याच्या या दानशूर कार्याबद्दल त्यांचे पती राजेंद्र ब्रह्मदंडे यांचा विशेष सन्मान पत्रकार संघाच्यावतीने करण्यात येणार आहे.
तरी या पुरस्कार वितरण सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे , असे आवाहन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , सचिव संजय सावंत , खजिनदार रोशन तांबे यांनी केले आहे.

error: Content is protected !!