सावंतवाडीत महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करत जयंतीउत्सवाचा दिमाखदार शुभारंभ!

भाजपा महाराष्ट्र युवा नेते मा विशालजी परब यांच्या समवेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोदजी कामत, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो भीमसैनिकांसोबत अभिवादन कार्यक्रम संपन्न

आज सावंतवाडी शहरात समाज मंदिरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेला अभिवादन करत जयंती कार्यक्रमाचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेकडो भीमसैनिकांची चैतन्यमय उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.

भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते मा. विशालजी परब, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय प्रमोद जी कामत, सावंतवाडी उपनगराध्यक्ष सन्माननीय ॲड अनिलजी निरवडेकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यप्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमांचा शुभारंभ केला. यावेळी शेकडो भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला.

error: Content is protected !!