गांजाची विक्री करण्याकरीता आलेल्या इसमाच्या कुडाळ पोलीसांनी आवळल्या मुसक्या

536 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत.

सिंधुदुर्ग जिल्हयात सध्या अंमली पदार्थाचे तस्करी, विक्रीचे प्रमाण वाढलले आहे. अनेक तरुण परिश्रमाशिवाय झटपट पैसा मिळवुन मौजमजा करण्याकरीता अशा अंमली पदार्थाची विक्रीचे व्यवसायात गुंतलेले आहेत, सदर अंमली पदार्थांचा वापर हा सध्या बहुतेक प्रमाणात तरुण पिढी वर्गामध्ये होत असल्याने त्यांचे भवितव्य अंधारमय झालेले आहे. भविष्यात तरुण पिढी अंमली पदार्थाच्या अंमलाखाली जावुन त्यांचे भविष्य अंधारमय होऊ नये याकरीता मा.पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग डॉ. मोहन दहिकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने शाळा, कॉलेज, सार्वर्जानक ठिकाणी जनजागृती करुन अंमली पदार्थाचे व्यसनांपासुन दूर राहण्याचे आवाहन केले होते.

अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्याकरीता अंमली पदार्थांची संवन व विक्री करणाऱ्या इसमांवर कठोर कायदेशिर कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक, सिधुदुर्ग यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा यांना आदेश केलेले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदुम, कुडाळ पोलीस ठाणे यांनी स्वतंत्र असे अंमली पदार्थ विरोधी पथक स्थापन केलेले होते व त्या पथकामार्फत अंमली पदार्थाची विक्री, संवन करणाऱ्या इसमांबाबत माहीती काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते.

आज दिनांक ०१.०४.२०२६ रोजी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रमोद काळसकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत कुडाळ MIDC वरची कुंभारवाडी येथील जुन्या पाण्याचे टाकीजवळ इसम नामे शुभम संदीप परब रा. कुडाळेश्वरवाडी ता. कुडाळ हा विक्रीकरीता आणल्याची बातमी प्राप्त झाली. त्या अनुषंगाने पो.नि. राजेंद्र मगदुम यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये सापळा रचुन सापळा रचून आरोपी शुभम संदीप परब वय २३ वर्ष रा. कुडाळेश्वरवाडी, ता. कुडाळ यास ताब्यात घेतले. नमुद आरोपीच्या ताब्यातुन ५३६ ग्रॅम वजनाचा (किं. रु. २६८०० गांजा, दोन चाकू, रोख रक्कम ३८७०/-, वजन काटा, रिकामी वापरलेल्या व न वापरलेल्या प्लॅस्टिक पिशव्या, आरोपीचे आधारकार्ड, मतदान ओळखपत्र असे एकूण ३८,२७०/- रु. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी शुभम संदीप परब यास अटक करुन ताब्यात घेण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग डॉ. श्री. मोहन दहिकर, मा. अपर पोलीस अधीक्षक, कु. नयोमी साटम, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी श्री. विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली व आदेशान्वये पोलीस निरीक्षक कुडाळ पोलीस ठाणे श्री. राजेंद्र मगदुम, पोलीस उपनिरीक्षक सचिन अवताडे, पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर, प्रमोद काळसेकर, संजय कदम, सचिन गवस, समीर बांदेकर, रुपेश गवस विष्णू रामदास यांनी केलेली आहे.

अंमली पदार्थ उदा. गांजा, चरस, एम.डी इत्यादी सारख्या अंमली पदार्थाच कोणी सेवन किवा कोणी ताब्यात बाळगत असल्यास त्या बाबतची माहीती पोलीस ठाण्यास देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक कुडाळ पोलीस ठाण यांनी केलेले आहे. बातमी देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

(

error: Content is protected !!