संदेश पारकर यांचे उपोषण म्हणजे प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी
कणकवली : कणकवली शहरात एस आय आर च्या प्रक्रिये बाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे न होणारे उपोषण हे निव्वळ गेले पंधरा दिवस चर्चेत राहण्याकरिताचा स्टंट होता. आज उपोषणाच्या आदल्या दिवशी संदेश पारकर हे कोणत्याही प्रकारे कोणालाही मध्यस्थी घालून उपोषण मिटवण्याकरिता प्रशासनाजवळ प्रयत्न करणार याची आम्हाला खात्री आहे. परंतु कणकवली शहरात जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बोगस मतदार असतील तर ते खरोखरच कमी झाले पाहिजेत. व संदेश पारकर यांनी हे मतदार कमी होण्यासाठी गेले पंधरा दिवस केलेले सर्व प्रकार फळाला आले पाहिजे. तर त्यांनी उपोषण हे केलेच पाहिजे उपोषण करायची घोषणा करून पळ काढू नका,व. कारण त्यांच्या उपोषणातून जर खरोखरच बोगस मतदार नोंदणी झाली असेल तर ती कमी होईल. व कणकवलीचा नगराध्यक्ष हा यापुढे कर्नाटकचे नाही तर कणकवलीचे मतदार निवडतील असे कणकवलीचे नगरसेवक गणेश उर्फ बंडू हर्णे यांनी म्हटले आहे.
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी गेल्या पंधरा दिवसात अनेकदा पत्रकार परिषदा घेत एसआयआर संदर्भात प्रशासन व मंत्र्यांपर्यंत निवेदन दिले. परंतु यांच्या निवेदनाला कोणीच किंमत देत नाही. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी संदेश पारकर यांचे उपोषण हे स्टंट ठरणार हे त्यांच्याच लक्षात आले. यामुळे त्यांनी कालपासून आपले उपोषण होण्यापूर्वीच आश्वासन घेऊन मिटवण्यासाठी आटापिटा सुरू केला आहे. कणकवली शहराच्या मतदार यादीवर व अधिकाऱ्यांवर आरोप करत असताना संदेश पारकर यांनी बोगस मतदार नोंदणीचा आरोप केला. ही बोगस मतदार नोंदणी जर झालेली असेल तर खरोखरच ही नावे काढली गेली पाहिजेत. पण जर अशी नोंदणी झालेली नसेल तर नगराध्यक्ष पारकर यांचा गेले काही दिवस असलेला आटापिटा कशासाठी होता ते न समजण्याएवढी कणकवलीची जनता दुधखुळी नाही. त्यामुळे न होणारे उपोषण करण्याचा फार्स नगराध्यक्ष पारकर यांनी केला असून हिम्मत असेल तर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी हे आमरण उपोषण करून दाखवावे. आणि केवळ प्रसिद्धीत राहण्यासाठी घोषणा न करता खरोखरच बोगस नावांबाबत आपण केलेले आरोप उपोषण करून सिद्ध करून दाखवावे. कारण आता मुख्याधिकारी यांच्या म्हणण्या प्रमाणे काम करत नाहीत, त्यांच्यावर आरोप केले, तहसीलदार प्रांत ऐकत नाही म्हणून त्यांच्यावर आरोप केले, जिल्हाधिकारी ऐकत नाहीत म्हणून त्यांच्यावर सुद्धा आरोप केले, आता आरोप करायला शिल्लक कुणी राहिले नाही, त्यामुळे पारकर यांच्या जुन्या सवयीप्रमाणे त्यांनी प्रशासनावर आरोप करून प्रसिद्धीत राहण्याचा हा सगळा स्टंट आहे. जर बोगस मतदारांमुळे मागची निवडणूक झाली असं पारकरांचा म्हणणं असेल तर या बोगस मतदारांच्या जीवावरच संदेश पारकर नगराध्यक्ष झाले का? त्याचे सुद्धा उत्तर पारकर यांनी द्यायला हवे. त्यामुळे उपोषण मिटवण्यासाठी नाही तर आमरण उपोषण करून संदेश पारकर यांनी आपल्या आरोपांपासून मागे हटू नये कणकवली शहराचे नगराध्यक्ष म्हणून हवी असल्यास त्यांना उपोषण स्थळी वैद्यकीय मदत द्यायची सुद्धा सोय आम्ही करू. जेणेकरून कणकवली शहराचे प्रतिनिधी म्हणून त्यांची कोणतीही काळजी घेण्यापासून वंचित राहू नये व त्यांच्या आरोप यापूर्वीच्या आरोपांप्रमाणे खोटे ठरू नयेत यासाठी संदेश पारकर यांना माझे आवाहन आहे की आरोप केलात तर आता मिटवा मिटवी करू नका. उपोषण करून हे आरोप सिद्ध करून दाखवा. आणि आमरण उपोषण करा. आमरण उपोषण केल्यास कणकवली शहर वासियांना देखील तुम्ही आतापर्यंत करत आलेल्या आरोपांमध्ये खरी खुरी माहिती होईल व त्यातून कणकवलीचे नगराध्यक्ष खोटे ठरणार नाही असे बंडू हर्णे यांनी म्हटले आहे


Subscribe










