वैभव नाईक यांचा सत्कार करत केक कापून वाढदिवस केला साजरा
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मांडकुली शाखेच्या वतीने शनिवारी मांडकुली येथे तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता. या डबलबारी सामन्याला वैभव नाईक यांनी भेट दिली असता त्यांचा सत्कार करत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. मांडकुली येथील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ यांनी वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे भजनी बुवांनी वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर गीत सादर करून संगीतमय शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गेली अनेक वर्षे मांडकुली गावात सेवा देणारे डॉक्टर दामले, डॉक्टर ढवण,डॉक्टर नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी,पंचायत समिती सदस्या ममता राऊळ, माजी सरपंच तुषार सामंत,उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर, उपविभाग प्रमुख कपिल म्हापसेकर, युवासेना शाखा प्रमुख सिद्धेश धुरी,तातू मुळीक, अभिषेक मराठे, राजेश सावंत, धनवान खवणेकर, संतोष पेडणेकर,गौरव पेडणेकर, गोविंद अनसुरकर, चेतन मुळीक, सत्यवान मुळीक, महादेव मुळीक, शिवाजी मुळीक, संदीप नेमळेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










