शाळेच्या अभ्यासाचा आला होता कंटाळा
मालवण तालुक्यातील घटना
मालवण : शाळेतील अभ्यास करण्याचा कंटाळा……. तर घरच्या व्यक्तीकडून अभ्यास करण्यासाठी होत असेलेला तगादा….. याच्या रागातून चक्क एका शाळकरी मुलीने भावाच्या मदतीने आपल्या अपहरणाचा बनाव रचला….. मात्र युवतीच्या या बनवामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कामाला लागली. ही घटना गुरुवारी मालवण तालुक्यात घडली…. युवतीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या उलट तपासणीत हे सत्य समोर आल्यावर सर्वांनीच सुटकेचा निसश्वास सोडला.
मालवण तालुक्यातील एका गावातील एक शाळकरी युवतीचे अपहरण झाल्याची माहिती मोबाईल द्वारे मालवण पोलिसांना तिच्या नातेवाईकानी दिली. त्यानंतर जिह्यातील पोलीस यंत्रणा युवतीच्या शोधासाठी कामाला लागली. युवतीने आपल्या भावासमवेत दळण टाकण्यासाठी जातो असे सांगून घरातून दुचाकीने बाहेर पडली…. यावेळी आपण मालवण येथे जातो तू घरच्यांना चौकशी केली तर काही पाच युवक ओमनी गाडीतून आले त्यांनी गाडीतुन घेऊन गेले…… अशी चित्रपटाला शोभेल अशी “स्टोरी, त्या युवतीने आपल्या लहान भावाला सांगण्यास सांगितली त्याला घरी सोडून ती निघून गेली…… युवती सायंकाळी मालवण येथे आली असता तिच्या मोबाईल लोकेशन वरून नातेवाईकांच्या मदतीने तिचा मालवण पोलिसांनी शोध घेतला…. अखेर रात्री दहा वाजता ती युवती मालवण दांडी परिसरात आढळून आली… युवतीच्या उलट तपासणीत आपण अभ्यासाला कंटाळून…. घराच्या व्यक्तीकडून होणारा त्रास यामुळे हा बनाव केल्याचे सांगितले. हा सगळा प्रकार आपण भावाच्या मदतीने केल्याचे तिने पोलिसांना सांगितले..

Subscribe









