गावराई येथील तरुणाची आत्महत्या

शाळेमागील फणसाच्या झाडाला घेतला गळफास

सिंधुदुर्गनगरी : गावराई सिद्धार्थनगर येथील सुंदर भगवान कदम (वय ३८) या तरुणाने शाळेमागील फणसाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुंदर कदम हा मनमिळावू स्वभावाचा होता. शुक्रवारपासून तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला होता. दरम्यान, शनिवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घरच्यांना शाळेमागील परिसरात फणसाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. ही घटना लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच सिंधुदुर्गनगरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतला आहे. दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून या प्रकरणाचा अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!