आरवली श्री देव वेतोबा जत्रोत्सव २ डिसेंबर रोजी

आरवली प्रतिनिधी: प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही श्री. देव वेतोबा, आरवलीचा वार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा अर्थात सोमवार दिनांक ०२ डिसेंबर २०२४ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानिशी संपन्न होणार आहे. या दिवशी रात्री श्रींची पालखी, दारु-सामानांची आतषबाजी व दशावतारी नाट्यप्रयोगही होणार आहे.दुस-या दिवशीही मंगळवार दिनांक ०३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी तुलाभार, गुणिजन गायन गौरव कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी श्री देवी सातेरीचाही वार्षिक जत्रोत्सव असल्यामुळे तिथेही रात्री देवीची पालखी प्रदक्षिणा, दारुसामान आतषबाजी व दशावतारी नाटक यांचे आयोजन केलेले आहे. तरी भाविकांनी या दोन्ही जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!