मुंबई : ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा, मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्तुंग यश संपादन केले. दिनांक २१ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोकणसिंधु पॉवर लिफ्टिंग सिंधुदुर्ग या संस्थेच्या खेळाडूंनी भरघोस यश संपादन केले. त्यांच्या यशामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवला गेला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत यश संपादन केलेल्या स्पर्धकांची नावे
1) सुरेश कदम M2= ब्रांझ मेडल
(वायगकार फिटनेस अकॅडमी, जामसंडे
2) आशेष पेडणेकर M1= ब्राँझ मेडल
(मसल क्रियेशन जिम आचरा )
3) प्रज्ञा पेडणेकरM1= ब्राँझ मेडल
(मसल क्रियेशन जिम )
4)चेतना चव्हाण M2= ब्राँझ मेडल
5) सचिन गवंडे M1= ब्राँझ मेडल
(एम्पायर जिम, कुडाळ )
6) आरती आंबेरकर ( सीनियर मुली ) सिल्वर मेडल
(Nirvna gym, कणकवली )
या सर्व खेळाडूंना कोकणसिंधु पॉवर लिफ्टिंग संस्थेचे अध्यक्ष – विट्टल देसाई, उपाध्यक्ष सावंत, सचिव संजय साटम , उपसचिव गणेश वायगणकर, खजिनदार प्रदीप नारकर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रणित धुमडे, गणेश वायंगणकर, आशेष पेडणेकर, सुरेश कदम, जितेंद्र मोंडकर, आरती आंबेरकर, टीना चौगुले, प्रज्ञा पेडणेकर, मुस्कान सारंग, चेतना चव्हाण, केदार चव्हाण, अमोल गुरव, रेहान खान, सचिन गवंडे, महेश परब हे खेळाडू सहभागी झाले होते.
संस्थेचे सचिव संजय साटम व उपसचिव गणेश वायंगणकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणसिंधु पॉवर लिफ्टिंग नावाचे एक छोटेसे रोपटे लावले होते. सर्वांच्या अथक प्रयत्नांनी या रोपट्याचे एक वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या संस्थेच्या खेळाडूंनी राज्यातच नाही तर राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या खेळाडूंना दहावी व बारावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुण मिळतात. शिवाय खाजगी तथा शासकीय नोकरी मिळवण्यासाठी देखील हे गुण फायदेशीर ठरतात. त्यामुळे सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त खेळाडूंनी पॉवर लिफ्टिंग या खेळाकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले आहे.



Subscribe










