शिक्षक भारती संघटनेने मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना दिली – सुर्यकांत चव्हाण

योग्य सराव ही परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली

कणकवली : शिष्यवृत्ती सराव परीक्षेत सराव पेपर सोडवल्यामुळे विद्यार्थी निश्चित वेळेत पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करतात. त्यामुळे लेखनाचा वेग, अचूकता आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढतो.
अनुभवी शिक्षकांनी तयार केलेले प्रश्नसंच – तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देतात.
परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली योग्य सराव आहे.असे प्रतिपादन कळसुली केंद्रप्रमुख सूर्यकांत चव्हाण यांनी केले.

ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती,जिल्हा शाखा सिंधुदुर्ग आयोजित मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा, केंद्र शाळा शिरवल येथील आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर
सरपंच. सौ. गौरी वंजारे,पोलीस पाटील सुशिल तांबे, मुख्याध्यापक
सुशील गोसावी, कळसुली भोगनाथवाडी मुख्याध्यापक टोनी म्हापसेकर, शिक्षक भारतीचे कणकवली तालुकाप्रतिनिधी अजित कदम,शाळा.व्यवस्थापन समिती अध्यक्ष – गुरुनाथ मेस्त्री,
शाळा व्यवस्थापन समिती (उपाध्यक्ष) श्री. मंगेश तांबे,
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बाळकृष्ण सातवसे,
पत्रकार तुळशीदास कुडतरकर, शिक्षक भारतीचे जिल्हा प्रतिनिधी श्री. दिलीप धामापूरकर,कविता पावसकर,गणपत मर्गज,माधवी राणे, ग्रामपंचायत सदस्य सौ.सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना सुर्यकांत चव्हाण म्हणाले की, शिक्षक भारती संघटनेने मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना दिली आहे.संघटनेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना दिशा देणारा आहे.शिक्षक भारती संघटनेचे ज्ञानदानाचे कार्य वाखाणण्याजोगी आहे.असे गौरवोद्गार हि त्यांनी काढले.

मुख्याध्यापक सुशिल गोसावी म्हणाले की,सराव प्रश्नपत्रिका सोडवणे हे परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे वेळेचे अचूक व्यवस्थापन, प्रश्नांचे स्वरूप समजणे, आत्मविश्वास वाढणे आणि स्वतःच्या चुका सुधारण्याची संधी मिळते, ज्यामुळे परीक्षेतील टक्केवारी वाढण्यास मदत होते. हे सराव पेपर्स परीक्षेचे ताण कमी करतात आणि अभ्यासातील कमकुवत दुवे शोधण्यास मदत करतात.शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे अभ्यास सोपा व नियोजित होतो.

सरपंच गौरी वंजारे म्हणाल्या की,
परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी नियमित व योग्यरीत्या सराव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फक्त अभ्यास पुरेसा नसतो; खर्‍या बोर्डसारखे पेपर सोडविल्याने विद्यार्थी वास्तविक परीक्षेचा अनुभव घेतात आणि परीक्षेची तयारी अधिक मजबूत होते.

टोनी म्हापसेकर म्हणाले की, सराव परीक्षेमुळे गुणांचे वितरण आणि अपेक्षित उत्तरलेखन शैली कशी असावी हे समजते .
लेखनाचा वेग वाढतो – दिलेल्या वेळेत संपूर्ण पेपर कसा सोडवायचा हे लक्षात येते.
परीक्षेची भीती कमी होते आणि ताण कमी होतो, आधीच सराव केल्यामुळे परीक्षा हॉलमध्ये आत्मविश्वास वाढतो.
स्वतःचे गुणांकन करून सुधारणा होते.कुठे चुका होत आहेत आणि काय सुधारायचे आहे याचा तंतोतंत अंदाज येतो.आणि
आत्मविश्वास वाढतो

पोलीस पाटील सुशिल तांबे म्हणाले की,
शिक्षक भारती जिल्हा शाखा- सिंधुदुर्ग आयोजित मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा इयत्ता ५ वी साठी आयोजित करुन चांगला पायंडा पाडला आहे.त्यामुळे निश्चित विद्यार्थ्यांना स्वतःच्या तयारीचे मुल्यमापन सराव संच सोडल्यानंतर करता येईल.त्यामुळे स्पर्धा परीक्षेत हि ते भाग घेतील आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

यावेळी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करुन करण्यात आली.यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापक सुशिल गोसावी तर सुत्रसंचलन दिलीप धामापूरकर आणि आभार अजित कदम यांनी मानले.

error: Content is protected !!