वैभववाडी प्रतिनिधी: वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील (PM- USHA) पीएम-उषा अंतर्गत, (IQAC) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी दोन दिवशीय “Innovations and Global Perspective on Humanities, Commerce & Management and Science & Technology” (मानवविद्या, वाणिज्य आणि व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील नवकल्पना आणि जागतिक दृष्टीकोन) या विषयावरील आंतरराष्ट्रीय बहुशाखीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के हे आंतरराष्ट्रीय परिषदेचे दि.२९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वा. उद्घाटन करणार असून श्रीम.शमा निमकर, कंटेंट मार्केटर व पत्रकार सहसंस्थापक (यूके), प्रा.(डॉ.) सुवर्णा देऊसकर,वाणिज्य विभाग प्रमुख, ए. सी. एस. महाविद्यालय लांजा, डॉ. मोहसीन तांबोळी, स्कूल ऑफ एनर्जी टेकनॉलॉजि, हैड्रोजन एनर्जी, कोरिया इन्स्टिटयूट ऑफ एनर्जी टेकनॉलॉजि, रिपब्लिक ऑफ कोरिया, डॉ. शरद पासले, ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स व सायन्स, कांदीवली, मुंबई आणि रशियाचे वरिष्ठ व्यवस्थापक गुणवत्ता व तांत्रिक सेवा फ्लेक्स डॉ. टी. पी. जाधव हे या दोन दिवसांसाठी तज्ञ मार्गदर्शक लाभले आहेत. तसेच महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.सदानंद रावराणे व कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. सदर आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याचे जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक व संशोधकांना आवाहन महाविद्यालय व्यवस्थापन समिती, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .सी.एस.काकडे व आयोजक समितीने केले आहे.
आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
1
/
76
पिंगुळी देऊळवाडी येथे पाझर तलावाजवळ होत असलेल्या प्रकल्पावर निर्बंध आणावा - जीजी उपरकर
आमच्याकडून कणकवली भयमुक्त करून लोकशाही प्रस्थापित केली जाईल - संदेश पारकर #kankavali
विजयानंतर राजन गिरप यांची प्रतिक्रिया #vengurla
कणकवलीच्या भूमीत चालत असलेला उन्मत्तपणा कणकवलीकरांनी गाढून टाकला
हे फळ मिळत असेल तर कार्यकर्ते काम करताना विचार करतील - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
चौकूळ ग्रामदैवत श्री. देवी सातेरी व भावईच्या वार्षिक जत्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत
डॉक्टरांकडून गैरफायदा घेतला जात असेल तर शासन नक्की होणार – नितेश राणे | Nitesh Rane #kankavali
मी स्वतःही झोपणार नाही आणि समोरच्याची पण झोप उडवणार | Nilesh Rane #nileshrane
आमदार निलेश राणे यांनी फलटणमध्ये सभा गाजवली | Nilesh Rane #nileshrane
५०० रुपयांसाठी त्या डॉक्टरने कानातली कुडी काढून घेतली #kankavali #sindhudurg
महिला डॉक्टरने समुदायावर चप्पल फेकल्यामुळे पुढील प्रकार घडला #kankavali #sindhudurg
केन एन बेक कॅफे कुडाळला भेट द्या आणि पेस्ट्रीचा मोफत आस्वाद घ्या #kudal #sindhudurg
1
/
76


Subscribe









