मध्य रेल्वेकडून दादर रेल्वे स्थानकामध्ये दोन प्लॅटफॉर्मच्या क्रमांकामध्ये बदल

मुंबई ब्युरो: मुंबईमध्ये मध्य रेल्वेकडून दादर रेल्वे स्थानकामध्ये आज २७ नोव्हेंबर पासून दोन प्लॅटफॉर्मच्या क्रमांकामध्ये बदल करण्यात आले आहे. काय आहेत बदल?आता फलाट क्रमांक १० हा ९A होणार आहे, तर फलाट क्रमांक १०A हा १० होणार आहे. यामध्ये नव्या रचनेनुसार, फलाट क्रमांक १०वर मेल एक्स्प्रेस येतील तर फलाट क्रमांक ९A वर लोकल ट्रेन येणार आहेत.मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयी वाढवण्याच्या उद्देशाने महत्त्वाच्या टप्प्यात दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्याचे कारण प्लॅटफॉर्म क्रमांक १०ची सध्याची लांबी २२ डबे असलेल्या गाड्या हाताळण्यासाठी अपुरी आहे, परिणामी ट्रेन मॅनेजर (गार्ड) च्या बाजूने ३ डबे प्लॅटफॉर्मच्या बाहेर राहतात.1. प्लॅटफॉर्म क्रमांक १० (जेथे पूर्वी मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या दोन्ही थांबत होत्या) त्याचे प्लॅटफॉर्म क्रमांक ९ ए असे बदल करण्यात आले आहे आणि ते फक्त उपनगरीय गाड्यांना सेवा देईल.2. प्लॅटफॉर्म १० ए (जेथे पूर्वी मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या देखील थांबत होत्या) चे प्लॅटफॉर्म क्रमांक १० असे करण्यात आले आहे. हा प्लॅटफॉर्म आता फक्त मेल/एक्स्प्रेस गाड्यांना सेवा देऊन २२ डब्यांच्या गाड्यांसाठी पुरेशी जागा सुनिश्चित करेल.

पूर्वीचा प्लॅटफॉर्म क्रमांक – नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक

०८-०८

०९ – ०९

१० – ९ए

१० ए – १०

११-११

१२ – १२

१३ – १३

१४ – १४

प्रवाशांच्या सोयी सुधारण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, मध्य रेल्वेने दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांकांत बदल केले आहेत. या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म ओळख सुलभ करणे आणि ‘खंड प्रवासाचा अनुभव सुनिश्चित करणे हा आहे.

error: Content is protected !!