बॅनर फाडणाऱ्यामध्ये हिंमत असेल तर त्याने समोर यावे – प्रसन्ना गंगावणे
कुडाळ : पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अजय आकेरकर यांच्या प्रचारार्थ गुढीपूर येथे लावण्यात आलेला बॅनर फाडण्यात आला आहे. यामध्ये महायुतीच्या अनेक नेत्यांचे फोटो देखील होते. या घटनेमुळे शिवसेनेचे गुढीपूर शाखाप्रमुख चांगलेच आक्रमक झाले असून ज्याने कोणी हे कृत्य केले असेल त्याने स्वतः समोर यावे. त्या व्यक्तीचा यथोचित सन्मान केला जाईल असे आवाहन प्रसन्ना गंगावणे यांनी केले आहे.


Subscribe










