फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात अनंत पिळणकरांना मिळतोय मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली : फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघातील लोकप्रिय उमेदवार अनंत पिळणकर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. फोंडाघाट मतदार संघातील प्रत्येक गावात मतदारांच्या घरोघरी भेटी घेत असताना मतदारांनी दिलेला विश्वास हाच माझ्या विजयाचा शुभ संकेत असल्याचे प्रतिपादन अनंत पिळणकर यांनी केले.
फोंडा जिल्हा परिषद मतदार संघातील लोरे पंचायत समितीमध्ये श्री गांगोलोरे चाळा येथे फोंडा जिल्हा परिषद चे उमेदवार श्री अनंत गंगाराम पिळणकर व लोरे पंचायत समितीच्या उमेदवार कीर्ती कृष्णा एकावडे यांनी लोरे गंगोचाळा मंदिर मध्ये दर्शन घेऊन नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ केला.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदर पारकर गुरुजी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख सिद्धेश राणे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे फोंडा विभाग प्रमुख रमेश राणे, लोरे शाखाप्रमुख निलेश राणे, घोणसरीचे माजी सरपंच कृष्णा एकावडे, घोणसरी ग्रामपंचायत सदस्य सचिन सुतार, गौरव एकावडे, तनया तोरस्कर, स्वाती घाडी, दर्शन मराठे, विशाल राणे, संतोष चव्हाण, रामदास पाटकर, अमित लाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते..
घरोघरी प्रचाराचा धडाका अनंत पिळणकर व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लावला आहे. मतदार संघातील समस्या सोडवत असताना फोंडाघाट मधील शुद्ध पाण्याचा प्रश्न सर्वप्रथम सोडवण्याची ग्वाही त्यांनी मतदारांना या घरोघरी भेटीदरम्यान दिली आहे.






Subscribe









