कुडाळ : चिमणी पाखरं टीम कुडाळ प्रस्तुत आणि श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘अप्सरा’ या प्रोफेशनल छोट्या कलाकारांच्या डान्स शो साठीचे ऑडिशन सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत होणार आहे. अप्सराचा पहिलाच शो सुपरहिट झाला असून आता काही नव्या कलाकारांना संधी देत असल्याचे नृत्य दिग्दर्शक रवी कुडाळकर आणि चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे सल्लागार सुनील भोगटे यांनी म्हटले आहे.
टीप
- ऑडिशनमध्ये निवड झाल्यास अप्सरा या व्यावसायिक शोमध्ये नृत्य करण्याची संधी मिळेल.
- ऑडिशन साठी वयोमर्यादा (५ ते १५ वर्षे मुलामुलींसाठी)
- ऑडिशन साठी कोणतीही फी नाही.
- ऑडिशन मध्ये एक मिनिटाचे कोणतेही नृत्य सादर करू शकता.
- डान्स करतेवेळी डान्सचा ड्रेस घालणं बंधनकारक नाही.
- आपल्या डान्सचे गाणे आपल्या मोबाईल मधून घेऊन येणे.
तरी इच्छुकांनी ऑडिशन साठी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन नृत्यदिग्दर्शक रवी कुडाळकर आणि चिमणी पाखर डान्स अकॅडमीचे सल्लागार सुनील भोगटे यांनी केले आहे.
स्थळ : मराठा समाज सभागृह, कुडाळ हायस्कूल शेजारी, कुडाळ
संपर्क : ९५०३५५४०८९

Subscribe










