मोठी बातमी…!देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री

तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निकाल लागल्यापासून राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून भाजपचे देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असणार अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात याची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

error: Content is protected !!