मुंबई-गोवा महामार्गावर ओरोसजवळ भीषण अपघात

इचलकरंजीचा चालक जखमी

ओरोस : मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस येथे एका भरधाव इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये चालक राजकुमार दीपक भांगलेकर (रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) हे जखमी झाले आहेत. सदर कार गोव्याच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. कारचा वेग मर्यादेबाहेर असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डाव्या बाजूच्या दुभाजकावर जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, कार विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवर (कणकवलीच्या दिशेने) जाऊन पलटी झाली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून चालक भांगलेकर यांना उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या वेळी कारमध्ये चालक एकटाच होता. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. याबाबतचा अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!