शिवसेना कुडाळ शहर प्रमुख व नगरसेवक अभिषेक गावडे यांनी स्वखर्चातून शहरातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी बैठक व्यवस्था दहा (बेंच) उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमांतर्गत एकूण दहा बेंच शहरातील प्रमुख ठिकाणी बसविण्यात आले आहेत. यामध्ये कविलकाटे सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरात २ बेंच, मळेवाडी येथे २ बेंच, कुमळाचा गाळू येथे १ बेंच, मुंबई–गोवा महामार्गालगत असलेल्या श्रीरामवाडी नरसिंह मंदिर परिसरात २ बेंच, लक्ष्मीवाडी मंदिर परिसरात १ बेंच तसेच तहसीलदार कार्यालयाजवळील विठ्ठलवाडी बालोद्यान (गार्डन) येथे २ बेंचचा समावेश आहे.
दि. ७ जानेवारी रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांतून साजरा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने सकाळी कविलकाटे येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बेंचचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रभागातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. स्वखर्चातून भगव्या रंगाचे बेंच उपलब्ध करून दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, प्रवासी व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
उपस्थित शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, कुडाळ नगरध्यक्षा सौ प्राजक्ता बांदेकर, गटनेते नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेवक ऍड राजीव कुडाळकर,नगरसेविका सौ नयना मांजरेकर, कु. चांदणी कांबळी,माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम,उपशहर प्रमुख चेतन पडते,प्रथमेश केळबाईकर, ता सचिव राकेश कांदे, चंदन कांबळी, राजवीर पाटील,संदेश चव्हाण,राजाराम गडेकर,निलेश जळवी,बाबू हरमलकर,आनंद अनावकर,राजन जळवी,प्रकाश जळवी,विलास वराडकर,महेश आळवे,बाबल आळवे,गोविंद मातोंडकर,रविन्द्र पवार आदी उपस्थित होते


Subscribe








