संविता आश्रमातील १८८ आश्रितांना मनोरंजन व नाश्त्याची भेट
कुडाळ : बाव गावातील गाळववाडीतील श्री. रामचंद्र पाटकर यांच्या विशेष पुढाकारातून जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम, पणदुर येथील निराधार बांधवांना अत्यंत मोलाची मदत मिळाली आहे. रस्त्यावरील अंध, अपंग, मतिमंद, मनोरुग्ण आणि वृद्ध अशा १८८ निराधार व्यक्तींना आश्रय देणाऱ्या या संस्थेतील आश्रितांच्या मनोरंजनाची गरज ओळखून, श्री. रामचंद्र पाटकर यांनी मित्रमंडळाच्या साथीने हे सहकार्य केले.
पाटकर यांच्याकडून संस्थेतील आश्रितांच्या मनोरंजनासाठी दोन सेट-टॉप बॉक्स भेट देण्यात आले, तसेच त्यांना आनंदाचा अनुभव देण्यासाठी २४० नाश्त्याचे बॉक्स वितरित करण्यात आले. सिध्दमहापुरूष मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकीचे एक उत्कृष्ट उदाहरण समोर ठेवले.
जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम ही संस्था निराधार बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी अविरत कार्यरत आहे. संस्थेतील आश्रितांच्या मनोरंजनासाठी सेट-टॉप बॉक्सची निकड श्री. रामचंद्र पाटकर यांनी ओळखून तत्परतेने हा उपक्रम राबविला.
हा स्तुत्य उपक्रम राबवताना रामचंद्र पाटकर यांच्यासह सिध्दमहापुरुष मित्रमंडळाचे कृष्णा पाटकर, संजय पालव, हर्षल पाटकर, अक्षय कुबल, सोपान पालव, अक्षय सरमळकर, आणि प्रथमेश सावंत हे सदस्य उपस्थित होते.
जीवन आनंद संस्थेचे सचिव श्री. संदीप परब यांनी या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सिध्दमहापुरूष मित्रमंडळाचे आणि विशेषतः श्री. रामचंद्र पाटकर यांचे आभार मानले आहेत. त्यांनी पत्राद्वारे कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले आहे की, “निराधार बांधवांच्या मनोरंजनासाठी ०२ सेट-टॉप बॉक्स आणि २४० नाश्त्याचे बॉक्स देऊन सहकार्य केल्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आपला ऋणी आहे.”
संस्थेने भविष्यातही सिध्दमहापुरूष मित्रमंडळाकडून अशाच प्रकारचे सहकार्य अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे.



Subscribe






