कणकवलीत EVM स्ट्राँग रूम बाहेर पोलिसांसह शहर विकास आघाडीचा पहारा

कणकवली | प्रतिनिधी : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर सर्व मतपेट्या कणकवली तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये स्थानांतरित करण्यात आल्या असून, त्या सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली कडेकोट पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार उमेदवारांना आपल्या प्रतिनिधींना स्ट्राँगरूमच्या बाहेर नियुक्त करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार कणकवली शहर विकास आघाडीकडून एक प्रतिनिधी सतत ड्युटीवर ठेवण्यात आला आहे. परिणामी स्ट्राँगरूमच्या बाहेर दिवस-रात्र पहारा दिसून येत असून, संपूर्ण परिसरात निवडणूक प्रक्रियेबाबत काटेकोर दक्षता राखण्यात आली आहे.

error: Content is protected !!