राणे – चव्हाण गळाभेट

अनेकांच्या भुवया उंचावल्या

नागपूर : मागील काही महिन्यांत, विशेषत: नगरपरिषद–पंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात वाद निर्माण झाले होते. राणेंनी चव्हाणांवर निवडणुकीमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता.

या आरोपांनी महायुतीत तणाव निर्माण केला होता. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच महायुती होऊ शकली नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

मात्र आज निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांची विधीमंडळ परिसरात हसतखेळत भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये गळाभेटही झाली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना, निलेश राणे म्हणाले की, माझं आणि रवींद्र चव्हाण यांचं काहीही वितुष्ट नाही, त्यांनी स्पष्ट केले की, जे काही चर्चेत आले, ते फक्त निवडणुकीपुरते होते.

तसेच राणेंनी चव्हाण हे आपल्या मोठ्या भावाप्रमाणे असल्याचं म्हटलं आहे. याचा अर्थ, वैयक्तिक पातळीवरील वाद नाही, तो फक्त राजकीय संघर्ष होता, असा संदेशही त्यांनी दिला.

यावेळी दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकमेकांची गळाभेट घेत त्यांनी आपल्यातील वाद आता संपुष्टात आल्याचं दर्शवलं आहे.

error: Content is protected !!