कणकवली : नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे उद्या १५ ला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरताना नलावडे हे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. येथील तहसील कार्यालयात १० नोव्हेंबरपासून नगराध्यक्ष व नगरसेवकपदांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र मागील ३ दिवसात एकही अर्ज दाखल झालेला नाही. मात्र भाजपचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत.
या इच्छुकांच्या मुलाखती भाजपचे निवडणूक प्रभारी मंत्री नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी नुकत्याच घेतल्या. भाजपच्या उमेदवारांची नावे उद्या शनिवारी सकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपने गुरुवारी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला असून भाजपने घरोघरी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.