कुडाळ नगरपंचायत कार्यालयाकडून टाकण्यात येणाऱ्या कचरा डम्पिंग करणे बंद करावे

स्थानिक नागरिकांचे कुडाळ नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत कार्यालयाकडून डम्पिंग करण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे आमच्या आरोग्याला धोका पोहोचत असून या कचऱ्यामुळे होणाऱ्या त्रासापासून आम्हाला आम्हाला मुक्त करावे. तसेच या ठिकाणी कचरा डम्पिंग करू नये अशी मागणी सांगीर्डे, पिंगुळी, शेटकर वाडी, गुढीपूर, गणेशवाडी, विठ्ठलवाडी, उद्यम नगर, रॉयल पाम येथील रहिवाशांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कुडाळ नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी यांना दिले आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही सांगिडे, पिंगुळी, शेटकरवाडी, गुढीपुर, गणेशवाडी, विठठलवाडी, उद्यमनगर, रॉयल पाल्म विभाग कुडाळचे निवासी असून आम्ही ही तक्रार पत्राद्वारे आपणास आमच्या सर्व विभागातील लोकांच्या संमत्तीने लिहित आहोत. तक्रार पत्रास कारण की आमच्या वरील सर्व विभागातील जागेनजिक नगरपंचायत कुडाळ च्या वतीने तब्बल दहा वर्षे खाजगी जमीनीमध्ये टाकण्यान येणारा ओला-सुका कचरा हा आमच्या विभागापासून खूपच नजीक असून तो कुजून त्याची दुर्गंधी पसरून आमच्या व पशु-पाळीव प्राण्यांचा आरोग्याला धोका त्रास होत आहे तसेच तो कुजलेला दूर्गंधी कचरा भटके श्वान इतरत्र सर्व ठिकाणी पसरत आहे, मात्र कुडाळ नगरपंचायतचे अधिकारी, आजी माजी नगराध्यश, नगरसेवक, यांना सर्व नागरिक मीडीयादवारे सांगुनसुद्धा आमच्या नजिकच्या विभागात टाकण्यात येणाऱ्या कुजलेल्या कुचऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे. ते या सर्व विभागांना विचारात घेत नाही आहेत कधीच कुजलेल्या कचऱ्याच्या तक्रारीबाबत लक्ष घालत नाही, भेट देत नाही अशी जर दुर्गंधी राहिली तर पुढील होणाऱ्या भयंकर त्रासामुळे आजार पण वाढत चालले आहे.

तरी आपण वरील बाबींवर लक्ष घालून आम्हा सर्वांना या विनाकारण दुर्गंधी पासून होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे.. पुढील पंधरा ते वीस दिवसात मा. आमदार, मा. खासदार मा. पालकमंत्री यांच्यासोबत योग्य ती चर्चा करुन योग्य तो प्रकल्प उपाय योजना करुन कचरा डंपीग करणे बंद न केल्यास आम्ही सर्वजण आमच्या कुटुंबासहीत जाऊन ते नागरी, मानवी हक्काने बंद करु. असे या निवेदनात म्हटले आहे.

error: Content is protected !!