९ जणांवर गुन्हा
कुडाळ : कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करून त्यावर सट्टा जुगाराचा खेळ खेळला जाणार असल्याची व्हाट्सअपवर जाहिरात केल्याप्रकरणी ९ जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ येथे कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करून त्यावर सट्टा खेळला जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत पोलिसांनी खात्री केली असता, जियाद खान (पिंगुळी, गोंधीयाळे) व साद शेख (मस्जिद मोहल्ला, कुडाळ) यांनी ही झुंज आयोजित करून यामध्ये अभिषेक नारायण काणेकर रा. माणगांव, कट्टागाव ता कुडाळ, अरमान फैय्याज कणेकर रा. कर्णेकर चाळ, कुडाळ बस स्थानकाचे मागे, कुडाळ अंजार कुल्ली रा. माणगांव, कुडाळ महेश साटेलकर रा. मळेवाड, सावंतवाडी गोसावी रा. मधली कुंभारवाडी, कुडाळ ऑन इब्राहीम शेख रा. मज्जीद मोहल्ला, कुडाळ रेल्वे स्थानकाजवळ, कुडाळ आणि एक अनोळखी इसम यांनी स्पर्धक म्हणून सहभाग दर्शवून सर्वांनी (आयोजक व स्पर्धक यांनी आपसी संगनमताने कोंबडयांच्या झुंजीवर सट्टा जुगाराचा खेळ खेळण्याकरीता जाहीरात करुन त्याची प्रसिद्धी केली होती. या सर्व आरोपींविरुद्ध कलम १२ (क) महाराष्ट्र जुगार अधिनियम सह कलम ३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार संजय कदम यांनी दिली असून याबाबतची माहिती कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.














 
	

 Subscribe
Subscribe









