कुडाळ : पिंगुळी गोंधयाळ येथील वेदांत रामदास करगुटकर (16) यांने शुक्रवारी सायंकाळी 7 वा च्या सुमारास घरांच्या टेरेसवर जाऊन छपराला नायलॉन दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली. वेदांत बॅ नाथ पै स्कुल मध्ये दहावीत शिकत होता. तो हुषार व शांत स्वभावाचा होता.
शाळेतून आल्यावर सायंकाळी तो गाडी घेऊन फिरायला गेला. त्यावेळी तो गाडी वरून पडला व गाडीही पडली. घरी आल्यावर आई ओरडली. बाबांना येऊ दे मग सांगतेच बघ, असे सांगून ओरडली. त्यानंतर काही वेळाने घरांच्या टेरेसवर गेला. तेथील नॉयलॉन दोरी घेऊन छपराच्या लोखंडी बाराला दोरी बांधून स्वतःला गळफास लाऊन घेतला.
वेदांत कुठे दिसत नाही म्हणून हाक मारली, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही। त्यावेळी शोध घेतला असता तो लटकताना दिसला. घरातल्यांनी ओरडा ओरड केल्यावर शेजारीही धावले. लागलीच त्यांनी त्याला कुडाळ ग्रामिण रुग्णालयात आणले. मात्र तत्पूर्वीच त्याचे निधन झाले होते.
याबाबतची माहिती पिंगुळीत समजताच तेथील लोकांनी कुडाळ ग्रामिण रुग्णालयत गर्दी केली. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात रुग्णालयातून माहिती देण्यात आली. कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेद्र मगदूम व सहकारी तात्काळ कुडाळ ग्रामिण रुग्णालयात दाखल झाले. लांनी माहिती घेऊन पंचनामा केला.


Subscribe










