ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या पडते यांची आमदार निलेश राणे यांनी घेतली भेट

प्रकृतीची केली विचारपूस

कुडाळ कुडाळ नगरपंचायतीच्या ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेले श्री. रुपेश पडते यांची कुडाळ-मालवणचे आमदार आणि शिवसेना नेते माननीय निलेशजी राणे साहेब यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन विचारपूस केली.

या भेटीदरम्यान आमदार राणे यांनी श्री. रुपेश पडते यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेतली. अपघातात झालेल्या दुखापती आणि सध्या सुरू असलेले उपचार याबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली.

आमदार निलेश राणे यांनी श्री. पडते यांना धीर देत, “तुम्ही लवकरात लवकर आणि पूर्णपणे बरे व्हावेत,” यासाठी मनापासून आशा व्यक्त केली. तसेच त्यांच्या कुटुंबाला लागेल ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

error: Content is protected !!