सावंतवाडी : गांजा विक्री केल्याप्रकरणी सावंतवाडी येथे एकाला आज सावंतवाडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज करण्यात आली. जावेद पीरसाब शेख (वय ३८) असे त्याचे नाव आहे. त्याच्या घराच्या अंगणात गांजा विक्रीच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून ३० ते ४० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जावेद हा आपल्या घराच्या अंगणात पाण्याच्या टाकीजवळ सायंकाळी ६ च्या सुमारास गांजा विक्रीसाठी थांबलेला होता. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ सापळा रचला. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक पंकड खंदरकर, हवालदार प्रविण वालावलकर, मनोज राऊत, मंगेश शिंगाडे आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पोलिसांनी संशयित जावेद याला ताब्यात घेवून त्याच्या घराच्या परिसराची व घराची झडती घेतली असता, त्याच्याजवळ विक्रीसाठी तयार ठेवलेला अंदाजे ३० ते ४० ग्रॅम गांजा मिळून आला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू तरुणांना व्यसनाधीन करणाऱ्या आणि परिसरात अंमली पदार्थांचे जाळे पसरवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.














 
	

 Subscribe
Subscribe









