ओरोस सिंधुदुर्ग नगरीत रविवार १७ मे रोजी होणार “दर्पण” पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर,आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार ,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती

“पत्रकारांना सवलतीच्या दरात हक्काचे घर” या पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेला मुहूर्त स्वरूप

    सिधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकारातून आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधूदर्पण गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी दर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन १७ मे रोजी दुपारी ४ वाजता सिंधुदुर्ग नगरी येथे खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर,आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार ,मराठी पत्रकार संघटनेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी,व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. तरी जिल्ह्यातील पत्रकारांनी आणि सर्व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर,व गृहनिर्माण प्रकल्पाचे चेअरमन संतोष राऊळ यांनी केले आहे.

    या गृहनिर्माण प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रम आणि सिंधुदुर्ग नगरी येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे पत्रकारांचे जिल्हास्तरीय स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.या सोहळ्यात पत्रकारांच्या पाल्यांच्या यशाचा ही सन्मान केला जाणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांच्या पाल्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव होणार आहे. ज्या पत्रकारांचे पाल्य उत्तीर्ण झाले आहे त्यांनी आपली नावे त्वरित जिल्हा पत्रकार संघाकडे नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे ,स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयासाठी विविध लोककला गुणदर्शन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पत्रकारांसह त्यांच्या पत्नी आणि मुलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. काल सादरी करण्यासाठी इच्छुकांनी आपली नावे आगाऊ कळविणे आवश्यक आहे. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व सदस्याने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .

    error: Content is protected !!