पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी : पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार यांना प्राधान्य देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमामुळे जिल्हा प्रशासनाने ‘हरित प्रशासन’च्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल टाकले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या इलेक्ट्रिकल वाहनाचे प्रत्यक्ष चार्जिंग करून या सुविधेची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी पर्यावरणपूरक विकासाची गरज अधोरेखित केली. वाढते प्रदूषण आणि इंधनाच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाच्या विविध स्तरांवर हरित ऊर्जा आणि स्वच्छ पर्यावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा सुविधा अधिकाधिक उभारल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या या चार्जिंग स्टेशनमुळे अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना इलेक्ट्रिकल वाहन चार्जिंगची सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे इलेक्ट्रिकल वाहनांच्या वापराला चालना मिळणार असून पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










