झाराप तिठ्यावर मोबाईल शॉपीसह गाळ्यांमध्ये चोरी

कुडाळ: कुडाळ तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप तिठा येथे असलेल्या एका मोबाईल शॉपीसह जवळच्या गाळ्यांमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये चोरट्यांनी १० हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झाराप तिठा येथील वैभव कांदे (मूळ रा. वजराट) यांची मोबाईल शॉपी अज्ञात चोरट्याने फोडली. मोबाईल शॉपीसह जवळ असलेल्या इतर गाळ्यांचे कुलूप देखील फोडण्यात आले. या गाळ्यांमधील काही साहित्य चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वैभव कांदे यांनी तातडीने कुडाळ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून घेतला असून, पुढील तपास सुरू आहे. महामार्गालगतच्या भागात झालेल्या या चोरीमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

error: Content is protected !!