महाविकास आघाडीने ‘ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव’ आंदोलनाने फळ-पिक विम्याच्या रक्कमेसाठी उठविला आवाज

दिवाळीपूर्वी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर उग्र आंदोलनाचा दिला इशारा

फळ बागायतदार संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी आंदोलनात झाले सहभागी

महायुती सरकार, कृषीमंत्री, पालकमंत्री आणि भारतीय कृषी विमा कंपनीचा केला निषेध

      वारंवार मागणी करूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांना फळ-पिक विमा नुकसानीची रक्कम अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही. राज्यातील महायुतीचे सरकार, कृषीमंत्री, पालकमंत्री  आणि भारतीय कृषी विमा कंपनी यांच्याकडून आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. एकीकडे विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची घोषणा करून दुसरीकडे विमा कंपनीला सत्ताधारी अभय देत आहेत. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या वतीने जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांसमवेत ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे 'ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव' धरणे आंदोलन छेडण्यात आले. माजी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर,शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, आंबा-काजू बागायतदार संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, शेतकरी व्ही. के. सावंत, शेतकरी विजय प्रभू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         शेतकऱ्यांना फळ-पिक विम्याची रक्कम मिळालीच पाहिजे! शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या पालकमंत्र्यांचा, कृषी मंत्र्यांचा, महायुती सरकारचा निषेध असो! भारतीय कृषी विमा कंपनीचा निषेध असो!  पैसे आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे! अशी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. महायुती सरकारच्या निषेधाचे फलकही झळकविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन दिवाळीपूर्वी फळ-पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर शेतकऱ्यांचा उद्रेक होऊन जिल्ह्यात उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला.   

      यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव,  उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजन नाईक, बबन बोभाटे, अभय शिरसाट,कन्हैया पारकर, बंडू ठाकूर, नंदू शिंदे, संजय गवस, मायकल डिसोझा, बाळू परब, अनंत पिळणकर, शिवाजी घोगळे,रुपेश जाधव, बाळ कनयाळकर, सचिन कदम, बाळा कोरगावकर,अतुल बंगे,जयभारत पालव,अनुप नाईक, माधवी दळवी, प्रतीक्षा साटम, दिव्या साळगावकर, संजना कोलते, प्रदीप मांजरेकर, प्रवीण वरुणकर, रविंद्र जोगल, एम. बी. गावडे, बाळू पालव, नागेश ओरोसकर,गुरु सडवेलकर, रमेश गावकर, सुनील गावडे, अशोक धुरी, शिवदत्त घोगळे, शैलेश टीळवे, स्वरूप कासार, दीपक जाधव, किरण टेंबुलकर, भालचंद्र जाधव, केतनकुमार गावडे, दादा नेवळेकर, देवेंद्र पिळणकर, उत्तम तेली, निलेश गोवेकर, महेश चव्हाण, अमित राणे, गुरु गडकर, भगवान परब,आप्पा मांजरेकर, सुनील तेली, निकेतन भिसे, संतोष परब, विलास गुडेकर, सिद्धेश राणे, दादा सावंत आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!