कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवकांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची घेतली भेट

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवकांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची भेट घेतली आणि कुडाळ शहराच्या विकासाबाबत चर्चा केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची सदिच्छा भेट कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी यांनी घेतले यावेळी कुडाळ शहराच्या विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने नगरपंचायतीची इमारत, मच्छी मार्केट तसेच कचरा प्रकल्प या संदर्भात चर्चा करण्यात आली.

error: Content is protected !!