शिवसेनेच्या ओबीसी व्हि. जे. एन. टी. तालुकाप्रमुख पदी रुपेश पिंगुळकर यांची नियुक्ती

कुडाळ : शिवसेनेच्या ओबीसी व्हि. जे. एन. टी. तालुकाप्रमुख पदी रुपेश पिंगुळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या झाराप येथील जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा सोमवारी संपन्न झाला. यावेळी शिवसेना ओबीसी व्हि. जे. एन. टी. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यापूर्वी त्यांनी पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिले आहे. फार मोठा युवावर्ग त्यांच्याशी जोडला गेला आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे कुडाळ तालुक्यात संघटना वाढीसाठी निश्चितच फायदा होणार आहे.

error: Content is protected !!