आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून निवजे ओझरवाडीसाठी ट्रान्सफॉर्मर मंजूर

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला विजेचा प्रश्न मार्गी

ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

कुडाळ : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला निवजे ओझरवाडी विजेचा प्रश्न आ. निलेश राणेंच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून निवजे ओझरवाडी येथील नागरिकांना वीज टंचाईच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात तर लोकांची फार तारांबळ उडत होती. शिवसैनिक विजय जाधव, साई पालव, निळकंठ लाड, विकास जाधव, किरण जाधव यांनी ही गोष्ट आ. निलेश राणे यांच्या कानावर घातली. आमदार निलेश राणे यांनी त्वरित ट्रान्सफॉर्मर साठी निधी मंजूर केला. या ट्रान्सफॉर्मरमुळे म्युझिक ग्रामस्थांची वीज टंचाईची समस्या दूर होणार असून ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. याबाबत सर्व ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले.

error: Content is protected !!