कुडाळ : भारतीय सैन्य दलात २४ वर्ष देश सेवेसाठी अर्पण करून सुखरूप गावी परतलेल्या निवृत्त नायब सुभेदार सुनिल सुर्वे यांचा सुर्वेवाडी ग्रामस्थांनी शनिवारी सायंकाळी मोठ्या जल्लोषात सत्कार केला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थित राहून सुर्वे यांच्या देशसेवेच्या कार्याबद्दल सन्मान केला.
डिगस सुर्वेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी शनिवारी सायंकाळी जय भवानी उत्कर्ष मंडळ व सुर्वेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवृत्त नायब सुभेदार सुनिल सुर्वे तसेच माजी सैनिक अमित सुर्वे या द्वयींचा मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थांनी उपस्थित राहून सुनिल सुर्वे यांचा यावेळी सत्कार केला. यावेळी ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, माजी सरपंच नित्यानंद कांदळगावकर व दीपक चोरगे, शेखर गोसावी यांनी सुनिल सुर्वे यांचा सत्कार केला. यावेळी सुरेश सुर्वे, सौ.संगिता सुर्वे, सौ.सावली सुर्वे, धोंडी सुर्वे, गजा सुर्वे, अनंत सुर्वे, प्रकाश सुर्वे, अतुल सुर्वे, कांता सुर्वे, दशरथ सुर्वे, अशोक सुर्वे, नामदेव चोरगे, मोहन सुर्वे, विशाल गायकवाड, सुशिल सुर्वे, अनिल सुर्वे, तुषार सुर्वे, सुधीर सुर्वे, हर्षद थवी, ओंकार चव्हाण, विष्णू सुर्वे, महेश सुर्वे, विश्वनाथ सुर्वे, वसंत कदम, शरद सुर्वे, ओंकार सुर्वे, गोट्या सुर्वे, अक्षय सुर्वे, चैतन्य गायकवाड, निलेश चोरगे, पारस सुर्वे, प्रणव सुर्वे, आयुष सुर्वे, संस्कार सुर्वे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त सैनिक संघ, शाखा (कुडाळ)चे अध्यक्ष श्यामसुंदर सावंत, सचिव बाळकृष्ण चव्हाण, माजी सैनिक वामन परब, अमित सुर्वे, भास्कर नाटळकर, प्रमोद जाधव, तानाजी बागवे, रघुनाथ परब, संजय नाईक यांनी संघटनेच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. डिगस ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच रूपेश पवार यांनी सत्कार केला. त्यांच्या समवेत राजू गुरव, बबन चव्हाण, मंदार कोठावळे, संतोष गोसावी आदी उपस्थित होते. याप्रसंगी अमरसेन सावंत आणि श्यामसुंदर सावंत यांनी मनोगत व्यक्त करून सुर्वे यांच्या देशसेवेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. हर्षद थवी यांनीही सुर्वे यांच्या देश सेवेच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन ज्ञानू पालव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी सुर्वेवाडी ग्रामस्थ व जय भवानी मंडळाने मेहनत घेतली.














 
	

 Subscribe
Subscribe









