सावंतवाडी : एका चिरेखाणीत काम करणाऱ्या १९ वर्षीय महिलेवर त्याच चिरेखाणीतील कामगाराने ३ ऑक्टोबरच्या रात्री बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या गुन्ह्यात मुख्य आरोपी फरार झाला होता. या मुख्य आरोपीस सावंतवाडी पोलिसांनी गोव्यातून रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, पाळत ठेवून मदत करणाऱ्या दुसऱ्या कामगारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही कामगारांवर बलात्कार आणि बलात्कारास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा मुख्य आरोपी थामस बा. (वय २१, रा. लसिया, झारखंड) याला रात्री उशिरा पोलिसांनी गोवा राज्यातून ताब्यात घेतले आहे. पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुळीक अधिक तपास करत आहेत.