निवजे गावातील घरांचे मोठे नुकसान
पीडित कुटुंबांना मदतीचे आमदार निलेश राणे यांचे आश्वासन
पीडित कुटुंबांना आमदार निलेश राणेंकडून आर्थिक मदत
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निवजे गावाला नुकत्याच आलेल्या शक्तिशाली वादळाचा मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत गावातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून, संसारोपयोगी साहित्याचेही अपरिमित नुकसान झाले आहे.
या वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि पीडित कुटुंबांना आधार देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी निवजे गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान, नुकसानग्रस्त कुटुंबांना आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली.संजय पडते
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, संजू परब शिवसेना जिल्हा प्रमुख, आनंद शिरवलकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख,
विनायक राणे शिवसेना तालुका प्रमुख कुडाळ, विजय जाधव
मागासवर्गीय तालुका प्रमुख कुडाळ, नागेश आईर विभाग प्रमुख आदी मंडळी उपस्थित होती.

Subscribe









