निवजे गावाला चक्रीवादळाचा तडाखा

लाखोंचे नुकसान

कुडाळ : मंगळवारी सकाळच्या सुमारास निवजे येथे चक्रीवादळ झाले. या वादळात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले.

मंगळवारी सकाळी साडेनऊ ते पावणेदहा वाजण्याच्या सुमारास प्रचंड चक्रीवादळ झाले. घू… घू… करत हे वादळ निवजे या गावात येऊन धडकले. या वादळाचा भयानक आवाज ऐकून ग्रामस्थांचा थरकाप उडाला. हे वादळ एवढे भीषण होते की, ग्रामस्थ नामनाईक यांच्या घराच्या छप्परासह सिमेंटचे पत्रे हवेत उंच उडून दूर जाऊन पडले. तर राऊळ यांच्या घराच्या कौलांचे व गोठ्याच्या छप्पराचे नुकसान झाले. यावेळी त्या गोठ्यात म्हशी होत्या. परंतु सुदैवाने म्हशींना कोणतीही दुखापत झाली नाही. या वादळाच्या तडाख्याने मोठ-मोठी झाडे उन्मळून पडली असून भात शेतीचे नुकसान झाले आहे.

एकंदरीत या वादळामुळे लोकांचे लाखोंचे नुकसान झाले असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या वादळात झालेली नुकसानीची भरपाई शासनाकडून लवकरात लवकर मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

error: Content is protected !!