चेंदवण देवस्थान समितीची विद्यालयाला मदत

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथील विद्यालयातील हॉल व इयत्ता दहावीचा वर्ग यांचे रंगकाम श्री माऊली, श्री देव पाताळेश्वर वगैरे देवस्थान उपसमितीच्या सौजन्याने करण्यात आले.

या उपक्रमामुळे शाळेच्या परिसराला नवे सौंदर्य लाभले असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे.

या सामाजिक कार्याबद्दल अध्यक्ष श्री संजय परब व संपूर्ण टीम श्री माऊली, श्री पाताळेश्वर देवस्थान उपसमिती चेंदवण चे चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबईआणि विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!