नामनिर्देशन दाखल केल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयासमोर जाहीर सभा
कणकवली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे हे आपला कणकवली विधानसभेच्या जागे करता उमेदवारी अर्ज सोमवार 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दाखल करणार आहेत. कणकवली गांगो मंदिर ते प्रांत कार्यालयापर्यंत या निमित्ताने रॅली काढण्यात येणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर जाहीर सभा देखील होणार आहे. या उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.