मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज सकाळी वर्सोवा वेसावे समुद्र किनारा येथे स्वच्छता अभियान

जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनाच्या निमित्ताने ‘समुद्र माझा, मी समुद्राचा’ हे स्वच्छता अभियान आज सर्वत्र रबविण्यात येत आहे. मंत्री नितेश राणे यांनी ‘प्लास्टिक मुक्त कोळीवाडे’ ची घोषणा केल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभाग व सागरी सीमा मंच च्या माध्यमातून रबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सहभाग घेतला.

कोळी बांधवांचा उदरनिर्वाह ज्या समुद्रावर चालतो. त्या समुद्रात आपण कळत नकळत प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कचरा टाकतो. हा कचरा माशांसोबत जाळ्यात येतो. याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर होतो. समुद्र किनारी घाणीचे साम्राज्य पसरते. अशा वेळी प्रश्न उपस्थित होतो आपण खरंच समुद्राला आपलं समजतो का? आपल्या घराप्रमाणे समुद्राची स्वच्छता राखली पाहिजे, ही भावना जागृत करण्यासाठी ही मोहीम रबविण्यात येत आहे.

error: Content is protected !!