ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आयडीयल स्टडी ॲप मार्गदर्शक – इनरव्हील अध्यक्षा सौ सानिका मदने
कुडाळ : इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून पं.पू.आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली-केरवडे शाळेतील इ.10 वीच्या 21 विद्यार्थ्यांना आयडीयल स्टडी ॲप वितरित करण्यात आले.यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ सानिका मदने ,आयएसओ सौ मेघा भोगटे, सदस्या सौ ऋतुजा परब व सौ पद्मा वेंगुर्लेकर, रोटरी असिस्टंट गव्हर्नर रो.सचिन मदने,मुख्याध्यापक श्री सुरेंद्र खोत सर, उपशिक्षक श्री. अनिल गोवेकर , सौ. प्रज्ञा रांगणेकर, श्री. राहूल कानडे ,श्री. विकास परब ,शालेय पालक शिक्षक संघ उपाध्यक्षा सौ मधुरा गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आयडीयल स्टडी ॲप मार्गदर्शक – इनरव्हील अध्यक्षा सौ सानिका मदने
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आयडीयल स्टडी ॲप मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ सानिका मदने यांनी व्यक्त केले. या उपक्रमांसाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सनसिटी, गव्हर्नर एरिया एड रो.डाॅ.विद्याधर तायशेटये व रोटरी क्लब ऑफ कुडाळ चेही सहकार्य लाभले असल्याचे सौ मदने यांनी सांगतानाच इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
रोटरी असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक यांना आयडीयल स्टडी ॲपबाबत सविस्तर माहिती प्रात्यक्षिकासह दिली. मुख्याध्यापक श्री सुरेंद्र खोत यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन उपशिक्षक श्री अनिल गोवेकर तर आभार सौ प्रज्ञा रांगणेकर यांनी केले.













