श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून गुरुवारी प्रस्थान

प्रतिनिधी : संतोष हिवाळेकर


अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णामाता की जय..!! च्या जय घोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून गुरुवारी प्रस्थान झाली. सदरचा प्रस्थान सोहळा न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २७ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येत आहे, यंदाचे २८ वे वर्ष असून, दरम्यान या परिक्रमेचा शुभारंभ श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे पुरोहित मंदार मोहनराव पुजारी, समाधी मठाचे धनंजय पुजारी, प्रसाद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ पदुकाच्या पूजनाने करण्यात आला.

दरम्यान न्यासाच्या महानैवद्या बरोबर अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी श्रींचे पादुकासह श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महानैवद्य पूजा संपन्न झाली. या प्रसंगी श्री वटवृक्ष देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे हे उपस्थित होते.

सदरच्या पालखी पुजानंतर न्यासाच्या परिसरात असलेल्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर व श्री भवानी माता मंदिर येथे पालखी पूजन करून, अन्नछात्रातून राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ, सोन्यामारुती चौक, वीर सावरकर चौक, मेन रोड, कारंजा चौक, बुधवार पेठेतील समाधी मठ येथे आरती, श्री मल्लिकार्जुन मंदिर, शिवछत्रपती, शिवाजी महाराज चौक (बस स्थानक) येथील श्री खंडोबा मंदिरातील आरती नंतर सोलापूरकडे पालखी मार्गस्थ झाली. दिनांक २१ नोव्हेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील सोहाळे येथे मुक्काम असणार असून दिनांक २३ नोव्हेंबर रोजी पालखी सांगली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

या पालखी प्रस्थान कार्यक्रमास न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, विश्वस्त भाऊ कापसे, लक्ष्मण पाटील, डॉ. मनोहर मोरे, डॉ. विनायक बुदले, पालखी परिक्रमा मुख्य संयोजक संतोष भोसले, मनोज निकम, अरविंद शिंदे, वैभव नवले, रामदास तांबे, स्वप्नील खवळे, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, पालखी पुरोहीत संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, श्रीकांत झिपरे, मंगेश सूर्यवंशी, गणेश भोसले, पिट्टू साठे, पिंटू दोडमनी, शिवा मंगरुळे, स्वप्नील मोरे, अंकुश चौगुले, योगेश पवार, अतिश पवार, अण्णा सावंत, अनिल गवळी, गोरख माळी, किरण जाधव, श्री गुरव, रोहित पवार, योगेश कटारे, शुभम चव्हाण, ज्ञानेश्वर भोसले, विराग माणिकशेट्टी, संतोष श्रीमान, गणेश पाटील, विनायक भोसले, सिद्धेश्वर माळी, बाबू मसुती, बाळासाहेब कुलकर्णी, रमेश हळसंगी, सिद्धाराम कल्याणी, रामचंद्रराव घाडगे, अप्पा हंचाटे, लखन सुरवसे, केदार तोडकर, मैनुद्दीन कोरबू, फहीम पिरजादे, निखील पाटील, प्रविण घाटगे, गोटू माने, प्रसाद मोरे, संजय गोंडाळ, रोहीत खोबरे, सौरभ मोरे, वैभव मोरे, किरण पाटील, अमित थोरात, स्वामिनाथ बाबर, वासू कडबगावकर, अप्पू म्हेत्रे, विपुल कदम, सुरज सावंत, विश्वनाथ कलशेट्टी, खंडेराय होटकर, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, महादेव अनगले, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, राहुल इंडे, दत्ता माने, बबुशा महिंद्रकर, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, शरदराव भोसले, शावारेप्पा माणकोजी, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, रमेश हेगडे, मल्लिनाथ कोगनुरे, सुमित कल्याणी, गोविंदराव शिंदे, शिवकुमार स्वामी, श्रीनिवास गवंडी, मल्लिकार्जुन बिराजदार, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, अंकुश पवार, दिनेश बंडगर, गणेश पवार, आकाश सूर्यवंशी, मुन्ना कोल्हे, बसवराज क्यार, भिमाशंकर कामशेट्टी, महेश भोसले, आकाश शिंदे, विकास पवार, श्रीशैल कुंभार, संभाजीराव पवार, बालाजी कटारे, पप्पू कोल्हे यांच्यासह भक्तगण सेवेकरी, वारकरी, कर्मचारी आदीजण उपस्थित होते. सोलापूर येथील शंकरालिंग महिला भजन मंडळ व अक्कलकोटच्या महिला भजन मंडळाने सेवा रुजू केले.


श्री सेवा : न्यासाच्या वतीने अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा संबंध महाराष्ट्रातील गावोगाव असलेल्या स्वामी भक्तांना करता यावे यासाठी श्री स्वामींच्या पालखी परीक्रमेचे आयोजन केले आहे. तसेच अन्य कारणास्तव दूरवरच्या आबाल वृद्ध, महिला स्वामी भक्तांना श्रींच्या दर्शनास्तव इच्छा असूनही स्वामींच्या मूळ स्थानी अक्कलकोट येथे येता येथ नांही अशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामीच त्यांच्या गावी येत आहेत.


अपूर्व संधी : श्री समर्थ स्वामींच्या साधू-संतत्वाची ख्याती आणि त्यांच्या भक्तीचा सुगंध गेली सव्वाशे वर्षापासून उभ्या भारतभर पसरत आहे. स्वामी भक्तांना श्री स्वामींच्या महात्म्याची प्रचीती येऊन तद्वत त्यांच्या भाक्तींची लौकिक आणि अलौकिक अनुभूती येऊन त्यांचे जिवन संपन्न बनत आहे. श्री स्वामी समर्थांची पालखी आपल्या गावी येत आहे. या योगे श्री स्वामी चरणी तन-मन-धनाने निष्ठा व सेवा अर्पण करण्याची ही अपूर्व संधी भक्तांना प्राप्त होत आहे.


न्यासाकडून सर्वोतोपरी सहकार्य : श्री स्वामींच्या मूळस्थान श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या इच्छानेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), स्थापन झाले असून येथे दैनंदिन दोन्ही वेळेस हजारोंच्या संख्येने स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. अन्नछत्रतर्फे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक, आपदग्रस्तांना मदत, आरोग्य विषयक इतर विविध कार्याक्रम्र राबविले जातात तसेच शासनाच्या विविध उपक्रमांना हे न्यास वेळोवेळी सर्वोतोपरी सहकार्य करीत असते.


भक्तांच्या सेवेर्थ : मंडळाच्या मालकीच्या जागेत यात्री निवास, यात्री भुवन, अतिथी निवास या निवासी या निवासी इमारती कार्यारत असून स्वमिभक्तांच्या सेवेत लवकरच भव्य असे महाप्रसादगृह इमारत रुजू होत असून सध्या महाप्रसादगृह इमारतीच्या बांधकामाचे काम सुरु झाले आहे. ही भव्य इमारत ५ मजली असून त्यावर ५१ फुटी श्री स्वामींची मूर्ती असणार आहे. ही इमारत वातानुकुलीत असून बांधकाम क्षेत्र १,०९,३९७ चौ,फु. इतके आहे. या इमारतीत एकावेळेस २००० भाविक महाप्रसाद घेतील व ५००० भाविक प्रतीक्षेत असतील इतक्या क्षमतेची आहे. याचा अंदाजित खर्च रक्कम रु. ६५ कोटी इतका अपेक्षित आहे. न्यासाच्या परिसरात सध्या स्वामी भक्तांच्या सेवेत तात्पुरत्या महाप्रसाद गृह बरोबरच श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर (नवसाचा गणपती), श्री भवानी माता मंदिर, नियोजित महाप्रसाद गृह इमारत स्टकचर, कपिला गाय, उभी स्वामी मूर्ती, कारंजा, शिवस्मारक, इनडोर-औटडोर जिम, प्रशस्त वाहन तळ, बालोध्यान शिवचरित्र प्रदर्शन हॉल, अग्निशामक, रुग्णवाहिका, राज्य परिवाहन महामंडळाच्या चालक व वाहकांना करिता अध्यावत राहण्याची सोय, सौर उर्जा प्रकल्प याबरोबरच विविध दिन उत्सव, पोर्णिमा, चतुर्थी, एकादशी आदी कार्यक्रम न्यास साजरा करते.


सन २०२४-२५ मध्ये ७ महिने पालखी :
गेल्या २७ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते. कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे मुक्काम तर गोवा राज्यातील २ जिल्ह्यात मुक्काम पालखीचा असतो. याबरोबरच बृहन मुंबई, ठाणे, वसई विरार, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पुणे या महानगरा बरोबरच सांगली, कोल्हापूर, सिधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, बुलाढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, नांदेड, अ.नगर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यातून परिक्रमा होत असून विशेष म्हणजे कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ राज्यासह गडचिरोली शहर व परदेशातून देखील मागणी होत आहे. पालखी परिक्रमेच्या अधिक माहितीसाठी मुख्य संयोजक संतोष भोसले-९८२२८१०९६६, ८५५८८५५६७५ यांना संपर्क करण्याचे आवाहन न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी केले आहे. सदर पालखी परिक्रमा ही ७ महिने महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यासह दिनांक २६ जून २०२५ रोजी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत विसावणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *