ओहोळात आढळला नवविवाहितेचा मृतदेह

विलवडे-मळावाडी येथील घटना

बांदा : विलवडे-मळावाडी येथून बेपत्ता असलेल्या नवविवाहितेचा मृतदेह गावातील ओहोळात आढळून आला आहे. रिया राजाराम दळवी (वय ३०) असे तिचे नाव आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. ती सोमवारपासून बेपत्ता होती. दरम्यान याबाबतची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिल्यानंतर बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

दरम्यान ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीड वर्षांपूर्वी तीचे लग्न झाले होते. ती काही दिवसापूर्वी माहेराला गेली होती. त्यानंतर घरी आल्यानंतर ती बेपत्ता झाली होती. गेले तीन दिवस तिचा शोध घेण्याचे काम सुरू होते. मात्र आज सकाळी तिचा मृतदेह ओहोळात आढळून आला. त्यामुळे या प्रकारा मागे नेमके कारण काय? याचा तपास पोलीस घेत आहे. तिच्या पश्चात पती, सासू-सासरे असा परिवार आहे.

error: Content is protected !!