विरण विकास संस्थेची वार्षिक सभा पार. सभासदांना दिली साखर भेट.

संतोष हिवाळेकर / पोईप

मालवण तालुक्यातील सर्वात मोठे कार्यक्षेत्र असलेल्या विरण विकास संस्थेची ७७ वी वार्षिक सभा नुकतीच संस्था अध्यक्ष रामदास पांजरी यांचे अध्यक्षतेखाली व माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.या वेळी उपाध्यक्ष पंकज परब, संचालक मोहन घाडीगांवकर, विश्वनाथ परब,बबन परब, दत्ताराम आंबेकर, रामचंद्र झोरे, सुचित्रा सावंत, बाळा परब , सौ.परब , जागृती परब ,सतीश मोहन गावडे, विजय घाडीगांवकर, सुभाष परब, कर्मचारी यांच्या सह संस्था सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे कार्यक्षेत्र असलेल्या मसदे, चुनवरे,मालोंड , बेलाची वाडी,वेरळ,राठीवडे,कोईळ,माळगाव येथील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व प्रथम उपस्थित संस्था पदाधिकारी व सभासद, कर्मचारी यांचे स्वागत संचालक मोहन घाडीगांवकर यांनी केले तर संस्था अध्यक्ष रामदास पांजरी यांचे परवानगिने सचिव मोहन गावडे यांनी सभेच्या विषयपत्रिके प्रमाणे सभेचे कामकाज पाहिले. या मध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून त्यास मंजुरी देण्यात आली. नंतर संस्थेची आर्थिक उलाढाल व प्रगती दर्शविणारा वार्षिक अहवाल वाचन करून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संस्थेच्या मुख्य विभाग व धान्य विभाग नफा..तोटा बाबत माहिती देण्यात आली. संस्थेच्या मुख्य विभाग व धान्य विभागाचे कामकाज चांगल्याप्रकारे होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.तसेच संस्थेने केलेल्या कर्ज वाटपाचे बाबत सचीव मोहन गावडे यांनी माहिती दिली व कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या कडील कर्जाची परतफेड मुदतीत करून संस्थेची आर्थिक प्रगती होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. उपस्थित सभासदांच्या सुचने प्रमाणे संस्थेची स्वतःची इमारत, गोडाऊन , खते,बियाणी ,शेती अवजारे, संस्थेने उपलब्ध करून देण्यात यावी व संस्था कार्यक्षेत्रातील सभासदांच्या गुणवंत मुलांचा दरवर्षी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात यावा . असे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. शेवटी संस्था अध्यक्ष रामदास पांजरी, अनिल कांदळकर यांनी विशेष मार्गदर्शन केले व मान्यवरांच्या हस्ते सर्व सभासदांना प्रत्येकी ३ कीलो साखर भेट देऊन गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.शेवटी संचालक मोहन घाडीगांवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.

error: Content is protected !!